गजराच्या आवाजाने गीतला जाग आली. कालच्या ड्रिंकमुळे हँगओव्हर झाला असल्यामुळे, तिचं डोकं जड झालं. तिने ग्रीन टी बनवला आणि प्यायला आणि मग मॉर्निंग वॉकला निघाली.
रोजचा गीतचा हाच दिनक्रम होता. सकाळी मॉर्निंग वॉक, मग कॉलेज, लेक्चर, रोज रात्री एक नवीन डेट, नाईटलाईफ, बस…
कालपासून तिची मैत्रीण नयना तिच्या डोक्यातून जात नव्हती. गीतच्या कथांवर टीका करणे हा नयनाचा छंदच होता.
“गीत, तुझ्या कथेची नायिका पुरुषाशिवाय नेहमी अपूर्ण का राहते?”
नैना, माझ्या मते स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांना पूरक आहेत. एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.
ती रागावली आणि म्हणाली, “नाही गीत, मला मान्य नाही. एखादी स्त्री आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आकाशालाही स्पर्श करू शकते. यशस्वी होण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक असते. पुरुषाची नाही.
मोठ्यामोठ्या बाता मारणारी नयना नवऱ्याची साथ मिळताच सर्व विसरून गेली आणि आपल्या संसारात पूर्णपणे गुरफटून गेली.
नयनाच्या निर्णयाने गीतचे मन आनंदित झाले. ती मनातल्या मनात हसली आणि मग तिथेच बाकावर बसली. लहान मुलांना स्केटिंग करताना बघायला तिला खूप आवडायचं. ती लहान मुलांना बघण्यात मग्न होती, तेवढ्यात एक आकर्षक तरुण येऊन बाकावर बसला. तिच्याकडे बघून तो ओळखीचे हसला. त्याचे वय असेल अंदाजे 30-32 वर्षे.
ही मराठी प्रेम कथा आमच्या ‘बंध प्रीतीचे’ या युट्युब चॅनलवर ऐका.
तो हसत म्हणाला, “माय सेल्फ प्रत्युष.”
“माय सेल्फ गीत”.
“वाह! खूप संगीतमय नाव.”
“धन्यवाद.”
त्याचा चेहरा आणि व्यक्तिमत्व पाहून गीतला धक्काच बसला, ज्या तेजसच्या आठवणी तिने मनाच्या पटलावरून पुसून टाकल्या होत्या, आज प्रत्युषने त्या आठवणींना उजाळा दिला होता.
तीच उंची, तीच चेहऱ्याची वैशिष्ट्ये, तीच चाल, तीच शैली, तीच बेफिकीर शैली आणि चेहऱ्यावर खुललेलं तेच गोड हास्य. गीत पुरती हरखून गेली.
गीत कॉलेजमध्ये लेक्चरर होती. 38 वर्षांची होती, पण दिसायला २७-२८ वर्षांची दिसत होती. ती रूप आणि सौंदर्याने समृद्ध होती. गोरा रंग, गोल चेहऱ्यावर पाणीदार, आकर्षक डोळे आणि उजव्या ओठावरचा तीळ ह्या सर्व गोष्टींमुळे ती मादक दिसत होती. एकदम बॉम्ब!!!
प्रत्युषला पाहताच गीतला तिचे कॉलेजचे दिवस आठवले. जेव्हा ती आणि तेजस विद्यापीठाच्या गल्लीत एकमेकांना भेटायचे. कॉफीहाऊसच्या कॉर्नर टेबलवर कॉफीचा कप घेऊन तासनतास एकमेकांच्या डोळ्यांत बघत तासंतास बसायचे. कधी पेपरच्या प्रश्नांवर चर्चा करायचे तर कधी भविष्याची स्वप्ने पाहायचे. पण एका दुर्दैवी घटनेने क्षणार्धात सारे काही उलथून टाकले.
एका अपघातात गीतचे वडील आणि आई दोघेही एकत्र जग सोडून गेले. तिच्यावर संकटांचा डोंगर कोसळला. लहान बहीण वाणी बारावीत तर भाऊ किंशुक दहावीत होता. अशा परिस्थितीत ती स्वतःच्या आनंदाचा विचार कसा करणार? तिने तेजसचे प्रेम नाकारले. तेजस तिच्यासोबत तिच्या भावंडांची जबाबदारी उचलण्यास तयार होता. पण गीताला कुणावर ओझे बनून जीवन जगायचे नव्हते.
आयुष्याचे ध्येय बदलून ती पदवी महाविद्यालयात लेक्चरर झाली. लेखन चालू केले. अनेक मासिकांमध्ये नियमित स्तंभलेखन सुरू केले. वाणी आणि किंशुक दोघेही परदेशात स्थायिक झाले. आता तिच्यापाशी उरला आहे तो फक्त तिचा एकटेपणा.
हळूहळू ती प्रत्युषला रोज भेटू लागली. एका स्माईलचं रूपांतर संवादात झालं. दोघांनाही एकमेकांची कंपनी आवडू लागली. लहानपणी एका अपघातात त्याचे वडील त्याला एकटे सोडून गेले होते, अशी वेदनादायक कहाणी त्याने बोलताना सांगितली. आईने दुसरं लग्न केलं. त्यांना आधीच एक मुलगा होता, त्यामुळे त्याला आई किंवा वडिलांचे प्रेम कधीच मिळाले नाही. आई नवीन बाबांना सतत घाबरायची आणि त्यामुळे तिला प्रत्युष नकोस वाटायचा.
मोठा झाल्यावर प्रत्युष इंजिनीअर झाला. हीच काय ती त्याच्या आयुष्याची जमेची बाजू आहे. आता त्याचा त्याच्या आईशी काहीही संबंध नाही. इतक्या मोठ्या जगात तो पूर्णपणे एकटा आह। त्याची कहाणी ऐकताना गीतचे डोळे भरून आले होते.
प्रत्युषची गोष्ट ऐकल्यानंतर गीतची त्याच्याबद्दलची सहानुभूती आणि प्रेम द्विगुणित झाले.
एके दिवशी त्याने विचारले, “तुझा फ्लॅट कोणत्या मजल्यावर आहे?”
“समोरच्याच सम्राट हाइट्स मध्ये ११ व्या मजल्यावर. २ bhk आहे. ऍक्चुअली हा फ्लॅट बाबांचा आहे. त्यांच्या मृत्यूनंतर आता माझ्याच नावे आहे.” गीत म्हणाली.
“अरे वा!! साऊथ मुंबईमध्ये २ bhk फ्लॅट? मजा आहे बाबा तुझी. मी तर लांब पार दहिसरला राहतो. तेही बॅचलर अकोमोडेशनमध्ये ” प्रत्युष गमतीने म्हणाला.
गीत हसली आणि म्हणाली,”अरे चल ना घरी कॉफी प्यायला. त्या निमित्ताने तुला माझा फ्लॅटही बघता येईल.”
मग हळूहळू प्रत्युष रेग्युलरली तिला भेटायला तिच्या घरी यायला लागला.
त्याच्या मनमोहक व्यक्तिमत्वाने आणि निरागस हास्याने भरलेले ‘हाय ब्युटीफुल’, ‘हाय स्मार्टी’ ऐकून तिला आनंद होई. मग ती पण त्याला ‘हाय हँडसम’ असे हसून म्हणायला लागली.
एखाद्या दिवशी तो मॉर्निंग वॉकला दिसला नाही तर त्या दिवशी गीतचे डोळे इकडे तिकडे प्रत्युषला शोधत असत. तो दिसला नाही की ती उदास आणि निराश होई.
त्याला पाहून आपल्याला इतका आनंद का होतो हे गीतला समजत नव्हते.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून तो दिसत नव्हता. त्याचा फोनही नॉट रिचेबल येत होता. गीतला प्रत्युषचे घरही माहित नव्हते. त्याचाशी संपर्क कसा करायचा हेच तिला समजत नव्हते.
प्रत्युषचाच विचार करत गीत कॉलेजला जायला तयार होत होती.
तेवढ्यात बेल वाजली. गीतने दरवाजा उघडला. दारात प्रत्युष होता. त्याला समोर पाहून ती रोमांचित झाली.
“अरे कुठे होतास तू इतके दिवस? मला तुझी किती काळजी वाटत होती. आणि तुझा फोन नॉट रिचेबल का येत होता?” तिने प्रत्युषवर प्रश्नांचा भडीमार चालू केला.
“अरे हो हो हो! मला आत तर येऊ दे अगोदर. कि दारातच ठेवणार आहेस मला?” त्याने हसून उत्तर दिले.
“ओह! सॉरी. प्लीज आत ये.” गीत म्हणाली.
“तु नाश्ता करशील का? मी माझ्यासाठी बनवणारच होते.” गीतने मोठ्या प्रेमाने त्याला विचारले.
“माय प्लेजर.”
गीतने पटकन ऑम्लेट बनवून आणले. तो लहान मुलासारखा डोळे मिचकावत म्हणाला, “व्वा, खूप टेस्टी.”
त्याच्यासोबत नाश्ता करताना गीतचे मन आनंदित झाले.
“हं! साहेब आता बोला. होतात कुठे इतके दिवस?” गीतने प्रत्युषला विचारले.
प्रत्युषचा चेहरा एकदम पडला. तो म्हणाला, “कुठे नाही. मला उगीच माझे टेन्शन तुला द्यायचे नाही.”
“अरे असे काय म्हणतोयस? तू मला तुझी friend समजत नाहिस का? सांग ना काय झाले?” गीतने काळजीने विचारले.
“आमच्या फ्लॅट ओनरने मला आणि माझ्या पार्टनरला येत्या आठवड्यात फ्लॅट रिकामी करायला सांगितला आहे. माझा रूम पार्टनर इथे मुंबईतच त्याच्या मावशीकडे राहायला जाणार आहे. माझे इथे ओळखीचे कुणीच नाही. कुणाकडे जाऊ मी? म्हणून फ्लॅट शोधात होतो इतके दिवस. पण इतक्या शॉर्ट नोटीसवर कुठे मिळणार फ्लॅट? म्हणून जरा टेन्शनमध्ये होतो.” प्रत्युषने आपली व्यथा सांगितली.
“हात्तिच्या! इतकेच ना? तू इथे माझ्या घरी ये राहायला.” गीत पटकन त्याला बोलली.
“पण, तू इथे एकटी रहात असताना? लोक काय म्हणतील?” प्रत्युष म्हणाला.
“अरे! ही मुंबई आहे. इथे कुणाच्या पंचायती करायला लोकांना वेळ नसतो. माझा २ bhk आहे. एका बेडरूम मध्ये तू राहा. एकात मी राहते.” गीतने त्याला मनवायचा प्रयत्न केला.
“ठीक आहे! मी आजच शिफ्ट होतो. पण तू माझ्याकडून भाडे घायचे हा.” प्रत्युष आनंदी होत तिला बोलला.
“म्हणजे काय?” गीतने मिश्किलीने त्याला उत्तर दिले.
तिला एक जोडीदार सापडला होता, ज्याच्याशी ती भावनिकरित्या जोडली गेली होती. रोज सकाळी खास त्याच्या आवडीचा नाश्ता, रात्री त्याच्या आवडीचे जेवण स्वतःच्या हाताने ती बनवू लागली.
तो घरी यायचा तेव्हा गीत त्याचे आवडते म्युझिक लावायची, कॉफी बनवायची आणि मग दोघे मिळून प्यायचे. कधी-कधी ते बिअरही प्यायचे.
बोलता बोलता प्रत्युष अनेकदा तिला चापटी मारायचा. त्याचा स्पर्श तिला रोमांचित करायचा. कित्येकदा तिला वाटतंय काय होतय मला… मी प्रत्युषच्या प्रेमात पडले आहे का? तो माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. मी असे नको करायला.
पण त्याला पाहताच ती सगळं विसरून जाई. ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. अनेकवेळा दोघेही रोमँटिक ट्यून वाजवून डान्स करायचे .
एके दिवशी, डान्स करत असताना त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि तिचे चुंबन घेतले.
ती लाजून पटकन त्याच्यापासून दूर झाली. पण ती या क्षणाची खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होती.
त्याने परत तिला आपल्याकडे खेचले आणि तिला परत एकदा चुंबन घेतले. ह्यावेळी गीतने त्याच्या मिठीतुन स्वतःला सोडवले नाही.
आता प्रत्युषने पॅशनेट होऊन तिच्या सर्वांगाचे चुंबन घेण्यास सुरवात केली. गीत पुरती मदहोश झाली. तिनेही तितक्याच पॅशनने त्याला साथ दिली.
हळूहळू दोघांच्याही अंगावरचे एकेक कपडे निघत गेले आणि प्रत्युषच्या भक्कम बाहुपाशात गीत पुरती हरवून गेली.
दोघेही एकमेकांत लीन झाले. आज दोघांमधील सर्व बंध तुटले होते. ती रात्र केव्हा सरली दोघांनाही कळलेच नाही.
जेव्हा तिचे सकाळी डोळे उघडले तेव्हा आपली विस्कळीत अवस्था पाहून तिला क्षणभर धक्काच बसला की अरे हे आम्ही काय केले. प्रत्युष माझ्याबद्दल काय विचार करेल? की शाररिक सुखापोटी मी भरकटले?
तिने प्रत्युषकडे पाहिलेदोघेही एकमेकांत लीन झाले. तो आरामात झोपला होता. एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्याचा चेहरा दिसत होता.
रात्रीचा हँगओव्हर कमी झाला नव्हता, मनात तृप्ती आणि चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. पण प्रत्युषच्या प्रतिक्रियेबद्दल मनात भीती आणि अस्वस्थताही होती.
तिची नजर आकाशात उगवत्या सूर्याकडे पडली. उगवणारा सूर्य काहींच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश घेऊन येतो, तर काहींच्या जीवनात दु:ख देतो. आज पक्ष्यांचा किलबिलाट कानात मधुर संगीताचा आभास देत होता. रोजच्या प्रमाणे त्याने त्यांच्यासाठी धान्य ओतले.
प्रत्युषच्या हाकेने ती थरथर कापली. ती त्याला तोंड द्यायला कचरत होती. त्याच्या हातात ग्रीन टीचा कप होता.
“हॅलो… गुड मॉर्निंग!” त्याने कप टेबलावर ठेवला आणि मग गुडघ्यावर बसून तिचा हात धरून म्हणाला, “मी एकटा आहे, तू पण एकटी आहेस, माझ्याशी लग्न करशील का?”
हेच ते शब्द होते ज्यासाठी गीतचे मन झुरत होते. आनंदाच्या आवेगाने ती प्रत्युषला जाऊन बिलगली.
आनंदाच्या झुल्यात गीत झुलत होती. प्रत्युषशी लग्न करून तिला त्यांच्या नात्याला गोड नाव द्यायचे होते, तिच्या भावंडांना आणि जवळच्या मित्रांना त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करायचे होते.
सर्वप्रथम तिने त्याला प्रत्युषच्या आईला भेटायला जाण्याचा आग्रह केला, पण तिचे नाव काढताच तो संतापला.
प्रत्युषला आर्यसमाज मंदिरात जाऊन कोणताही गाजावाजा न करता गुपचूप लग्न करायचे होते आणि गीतला कोर्टामार्फत नोंदणीकृत विवाह करायचा होता. यावरून दोघांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.
त्याने तिच्यासाठी हिऱ्याची अंगठी आणली होती, पण तिच्या जाणकार डोळ्यांनी क्षणात ओळखले की ती बनावट आहे.
काही दिवसांनंतर, प्रत्युषने गीतला सांगितले की कुणीतरी त्याचे वॉलेट चोरले. त्याचे एटीएम कार्ड पण त्यात असल्याने मोठा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्या बाईकचा हफ्ता पण भरायचा होता. त्याने नवीन एटीएम कार्ड साठी अप्लाय केले होते पण ते येईपर्यंत थोडे दिवस जाणार होते. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गीतने सहानुभूती दाखवत तयीचे एटीएम कार्ड प्रत्युषला दिले.
प्रत्युष तिच्या पैशावर मजा करू लागला. कधी शॉपिंग तर कधी पार्टी. साऱ्यांचे पैसे गीतच्या एटीएम कार्डमधून जात असत. एके दिवशी न राहवून गीतने प्रत्युषला ह्याचा जाब विचारला, त्याचे एटीएम कार्ड केव्हा येणार ह्याचीही चौकशी केली. तेव्हा तो गर्विष्ठपणे म्हणाला, “माझ्या एटीएम कार्डचा थोडा प्रॉब्लेम झालाय. कार्ड आले की मी सगळे पैसे देईन.”
Actually, हे सगळे transactions प्रत्युष त्याच्या अकाउंट मधून डिरेक्टली ऑनलाईन पण करू शकत होता. पण गीतने संकोचामुळे हे त्याला विचारले नाही.
पण तो जे बोलला त्याचा टोन काही तिला आवडला नाही. तिच्या हळूहळू लक्षात येऊ लागले की जेव्हा कधी प्रत्युषला फोन येतो तेव्हा तो हल्ली तिच्यासमोर बोलत नाही. घराबाहेर जाऊन तासनतास बोलत बसतो.
संशयाने तिने त्याचा फोन आणि लॅपटॉप तपासण्याचा प्रयत्न केला पण दोन्हीही पासवर्ड प्रोटेक्टड होते.
त्याच्या या सगळ्या गोष्टी तिला त्रास देऊ लागल्या. नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे हे तिच्या लक्षात आले. तिने शांतपणे एका गुप्तहेराला कॉन्टॅक्ट केला. त्याने घरात अनेक ठिकाणी स्पाय कॅमेरे लावले. मग त्यांनी त्याची वस्तुस्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली.
काही दिवसांतच सोसायटीचा चौकीदार आणि खासगी गुप्तहेर यांच्या मदतीने त्याच्या कुकर्माची कुंडली तिच्यासमोर आली.
प्रत्युष हा अभियंता नव्हता, तर तो एका टोळीचा सदस्य होता, जो वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यरत होती. एकट्या राहणाऱ्या तरुणींना फसवून, त्यांना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवून, त्यांचा पैसाअडका लुटायचा आणि रात्रीच्या पोटात दुसऱ्या शहरात गायब व्हायचे. यामध्ये त्याचा निरागस, सुंदर चेहरा आणि अस्खलित इंग्रजी बोलणे खूप उपयोगी पडायचे.
आता तिने तिच्या गुप्तहेरांच्या मदतीने पोलिसांना संपर्क केला आणि त्यांना सर्व परिस्थितीची कल्पना दिली. प्रत्युष विरुद्ध सगळे पुरावे दाखवले. त्याला रंगेहात पकडण्यासाठी पोलिसांतर्फे एक सापळा रचण्यात आला. सकाळी कॉलेजला जाताना ती मुद्दाम तिच्या चाव्यांचा गुच्छ डायनिंग टेबलवर विसरून गेली. प्रत्युषच्या चाणाक्ष नजरेने ते पटकन हेरले.
गीत घराबाहेर पडताच कॉलेजला न जाता पार्किंग लॉट मध्ये आली जिथे तिचा गुप्तहेर आणि पोलीस अगोदरच तिची वाट बघत बसले होते. तिने खाली येऊन पटकन तिचा लॅपटॉप ऑन केला, ज्यात घरातील सगळे स्पाय कॅमेरे लाईव्ह रेकॉर्डिंग दाखवत होते.
प्रत्युषने मास्टर चावीने लॉकर उघडण्याचा प्रयत्न करतानाचे त्याचे संशयास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले. तिचा डायमंड सेट आणि रोख रक्कम घेऊन तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
कॅमेऱ्यातील पुराव्याच्या आधारे पोलिसांनी त्याला बेड्या घातल्या.
गीतचे प्रेम पुरते ओसरले होते. आपल्या प्रेमाची अशी अवस्था पाहून तिचे डोळे भरून आले. आयुष्याच्या जोडीदाराच्या शोधात ती एक श्वापदाचे भक्ष होणार होती. पण तिच्या सावध स्वभावामुळे आणि परमेश्वराच्या कृपेमुळे ती प्रेमाच्या खोट्या मृगजळात फसण्यापासून वाचली.