1 ते 100 मराठी अंक अक्षरी | 1 to 100 Numbers in Marathi

1 ते 100 मराठी अंक अक्षरी | 1 to 100 Numbers in Marathi

मराठी अंक अक्षरी 1 ते 100 :आजकाल इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे आपण इंग्रजी साहित्य जास्त वाचतो. त्यामुळे आपली आपल्या मराठी भाषेवरची पकड कमी होत चालली आहे. साधे मराठी आकडेही आजकालच्या पिढीला नीटपणे वाचता अथवा बोलता येत नाहीत.

साधे 100 मराठी अंक (1 to 100 Marathi Number) बोलण्यात सुद्धा लोकांना खूपअडचण येते. आपली ही समस्या लक्षात घेऊन आम्ही आमच्या आजच्या ह्या लेखात एक ते शंभर अंक अक्षरी (1 to 100 Number Names in Marathi) आपल्या सोयीसाठी दिले आहेत.

आपल्या शालेय अभ्यासासाठी आपण हे मराठी अंक अक्षरी 1 ते 100 (1 to 100 Marathi numbers names) वापरू शकता. पीडीएफ डाउनलोड करण्याची लिंक शेवटी दिली आहे.

Marathi Ank Akshari

मराठी अंक अक्षरी 1 ते 100

मराठी अंकअक्षरी अंकइंग्रजी अंकTransliteration
एक  1Ek
दोन2Don
तीन3Teen
चार4Char
पाच5Paach
सहा6Saha
सात7Saat
आठ8Aath
नऊ9Nau
१०दहा10Daha
मराठी अंकअक्षरी अंकइंग्रजी अंकTransliteration
११अकरा 11Akara
१२बारा12Bara
१३तेरा  13Tera
१४चौदा14Chauda
१५पंधरा15Pandhara
१६सोळा16Sola
१७सतरा17Satara
१८अठरा18Athara
१९एकोणीस19Ekonis
२०वीस 20Vis
मराठी अंकअक्षरी अंकइंग्रजी अंकTransliteration
२१एकवीस  21Ekvis
२२बावीस  22Bavis
२३तेवीस23Tevis
२४चोवीस24Chovis
२५पंचवीस25Panchvis
२६सव्वीस26Savvis
२७सत्तावीस27Sattavis
२८अठ्ठावीस28Aththavis
२९एकोणतीस29Ekontis
३०तीस30Tis
मराठी अंकअक्षरी अंकइंग्रजी अंकTransliteration
३१एकतीस31Ektis
३२बत्तीस32Battis
३३तेहतीस33Tehttis
३४चौतीस34Chautis
३५पस्तीस35Pastis
३६छत्तीस36Chhattis
३७सदतीस37Sadatis
३८अडतीस38Adatis
३९एकोणचाळीस39Ekonchalis
४०चाळीस40Chalis
मराठी अंकअक्षरी अंकइंग्रजी अंकTransliteration
४१एकेचाळीस  41Ekechalis
४२बेचाळीस42Bechalis
४३त्रेचाळीस43Trechalis
४४चव्वेचाळीस44Chavvechalis
४५पंचेचाळीस45Panchechalis
४६सेहेचाळीस46Sehechalis
४७सत्तेचाळीस47Sattechalis
४८अठ्ठेचाळीस48Aththechalis
४९एकोणपन्नास49Ekonpannas
५०पन्नास50Pannas
मराठी अंकअक्षरी अंकइंग्रजी अंकTransliteration
५१एकावन्न51Ekavann
५२बावन्न52Bavann
५३त्रेपन्न53Trepann
५४चोपन्न54Chopann
५५पंचावन्न55Panchavann
५६छपन्न56Chhapann
५७सत्तावन्न57Sattavann
५८अठ्ठावन्न58Aththavann
५९एकोणसाठ59Ekonsath
६०साठ60Sath
मराठी अंकअक्षरी अंकइंग्रजी अंकTransliteration
६१एकसष्ट61Eksashth
६२बासष्ट  62Basashth
६३त्रेसष्ट63Tresashth
६४चौसष्ट  64Chausashth
६५पासष्ट65Pasashth
६६सहासष्ट66Sahasashth
६७सदुसष्ट67Sadusashth
६८अडुसष्ट68Adusashth
६९एकोणसत्तर69Ekonsattar
७०सत्तर70Sattar
मराठी अंकअक्षरी अंकइंग्रजी अंकTransliteration
७१एकाहत्तर71Ekahattar
७२बहात्तर72Bahattar
७३त्र्याहत्तर73Tryahattar
७४चौर्‍याहत्तर74Chauryahattar
७५पंच्याहत्तर75Panchyahattar
७६शहात्तर76Shahattar
७७सत्त्यात्तर77Sattyahattar
७८अठ्ठ्यात्तर78Aththyahattar
७९एकोणऐंशी79Ekonainshi
८०ऐंशी80Ainshi
मराठी अंकअक्षरी अंकइंग्रजी अंकTransliteration
८१एक्क्याऐंशी81Ekkyaainshi
८२ब्याऐंशी82Byaainshi
८३त्र्याऐंशी83Tryaainshi
८४चौऱ्याऐंशी84Chauryaainshi
८५पंच्याऐंशी85Panchyaainshi
८६शहाऐंशी86Shahaainshi
८७सत्त्याऐंशी87Sattyaainshi
८८अठ्ठ्याऐंशी88Aththyaainshi
८९एकोणनव्वद89Ekonnavvad
९०नव्वद90Navvad
मराठी अंकअक्षरी अंकइंग्रजी अंकTransliteration
९१एक्क्याण्णव91Ekkyannav
९२ब्याण्णव92Byannav
९३त्र्याण्णव93Tryannav
९४चौऱ्याण्णव94Chauryannav
९५पंच्याण्णव95Panchyannav
९६शहाण्णव96Shahannav
९७सत्त्याण्णव97Sattyannav
९८अठ्ठ्याण्णव98Aththyannav
९९नव्व्याण्णव99Navvyannav
१००शंभर100Shambhar

मित्रांनो, आम्हाला आशा आहे कि वरील माहिती आपल्याला फारच उपयुक्त ठरेल. 1 ते 100 मराठी अंक अक्षरी PDF कॉपी डाउनलोड करण्यासाठी खालील icon वर क्लिक करा.

Leave a Reply