जेव्हा सीड्स चा विषय येतो, तेव्हा सर्व सीड्स लहान आणि एकाच प्रकारच्या दिसतात आणि त्यांच्यात गोंधळ होणे सामान्य आहे. पण लोक सर्वात जास्त कन्फ्यूज होतात ते चिया सीड्स आणि सब्जा सीड्स मधे (difference between chia and sabja). आजकाल बरेच लोक या दोन्ही गोष्टींना आरोग्यदायी मानतात आणि त्यांचा आहारात समावेश करतात. त्यांचे वजन कमी करणे आणि शरीरातील विविध पौष्टिक घटकांच्या गरजा पूर्ण करणे यासारखे वेगवेगळे फायदे आहेत.
बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की चिया आणि सब्जाच्या बिया सारख्याच आहेत कारण ते सारखे दिसतात. पण जेव्हा तुम्ही बारकाईने पाहाल तेव्हा तुम्हाला नक्कीच फरक दिसेल. पण या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? (what is the difference between chia and sabja seeds) चला जाणून घेऊयात.
चिया आणि सब्जा सीड्स मधील फरक (difference between chia seeds and sabja in marathi)
१. मूळ
चिया सीड्सचा उगम मध्य आणि दक्षिण मेक्सिकोमध्ये झाला. त्या परदेशी सीड्स आहेत. तर सब्जा सीड्सना बेसिल सीड्स (तुळशीच्या बिया) असेही म्हणतात. ह्या दोन्ही सीड्स आरोग्यासाठी खूप चांगल्या आहेत.
२. पोषकतत्वे
चिया सीड्स
चिया सीड्समध्ये कॅलरी नसतात आणि त्या ग्लूटेन-मुक्त असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही चिया पुडिंग, स्मूदी किंवा सॅलडमध्ये चिया सीड्स टाकून खाऊ शकता. चिया सीड्समध्ये ६ टक्के पाणी, ४६ टक्के कर्बोदके, ३४ टक्के चरबी आणि १९ टक्के प्रथिने असतात.
याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्समुळे नुकसान होण्यापासून वाचवतात. चिया सीड्समध्ये फायबर आणि प्रथिने देखील मुबलक प्रमाणात आढळतात. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि प्रोटीनमुळे भूक कमी होते.
सब्जा सीड्स
सब्जाच्या सीड्समध्ये कॅलरी कमी असते. तुम्ही सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून त्याचे सेवन करू शकता. त्याची चव तुळशीसारखी असते. ह्याची स्मूदी बनवून देखील त्याचे सेवन करता येते. 13 ग्रॅम सब्जाच्या बियांमध्ये 2 ग्रॅम प्रथिने, 7 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 2.5 ग्रॅम चरबी आणि 1240 मिलीग्राम ओमेगा-3 असते जे पोटासाठी चांगले असते. सब्जाच्या बियांमध्ये पेक्टिन आढळते, जे भूक कमी करते आणि वजन नियंत्रित करते.
३. रंग आणि आकार
चिया सीड्स काळ्या रंगाच्या नसून राखाडी, तपकिरी, पांढरट रंगाचे असतात. तर सब्जाच्या सीड्स लहान, गोलाकार आणि काळ्या रंगाच्या असतात.
चिया सीड्स आकाराने अंडाकृती असतात तर सब्जाच्या सीड्स किंचित लांब असतात.
जेव्हा तुम्ही चिया आणि सब्जाच्या सीड्स भिजवता तेव्हा हे स्पष्टपणे दिसून येते की चिया सीड्सचा रंग राखाडी आहे तर सब्जाच्या सीड्सचा रंग काळा आहे.
सब्जाच्या सीड्स खूप लवकर पाणी शोषतात. पाणी शोषल्यानंतर ह्या सीड्स जेलीसारख्या दिसतात, तर चिया सीड्सना पाणी शोषण्यास वेळ घेतात आणि पूर्ण भिजल्यानंतर त्या त्यांच्या आकाराच्या 10 पट फुगतात.
४. चव
चिया सीड्सना कुठली खास अशी चव नसते. त्या आपण डिशमध्ये मिसळून खाऊ शकतो. परंतु सब्जाच्या सीड्सना तुळशीचा वास आणि चव असते.
५. चिया आणि सब्जा सीड्सचे सेवन
चिया सीड्स भिजवून किंवा कच्च्या खाऊ शकतात. तुम्ही चिया सीड्स पाण्यात भिजवून सेवन करू शकता. एका ग्लास पाण्यात एक चमचा चिया सीड्स टाका आणि ते पाणी सकाळी उठल्यावर प्या.
चिया सीड्स खूप कुरकुरीत असतात. या सीड्स एका तव्यावर भाजून घ्या आणि नंतर एका बडीशेपप्रमाणे चावून खा.
तुम्ही चिया सीड्स चे पावडर बनवूनही सेवन करू शकता. या सीड्स मिक्सरमध्ये टाकून त्यापासून पावडर बनवा आणि नंतर त्याचे सेवन करा.
त्याचप्रमाणे चिया सीड्सचा वापर शीतपेये, स्मूदी, पुडिंग आणि सॅलॅडमध्येदेखील करता येतो.
सब्जा सीड्स स्मूदी, सरबते किंवा फालुद्यासारख्या पदार्थांत टाकून खाता येतात.
६. आरोग्यासाठी होणारे फायदे
चिया आणि सब्जाच्या सीड्स मध्ये जवळजवळ समान पोषक तत्वे आढळतात. हे दोन्ही पौष्टिक आणि आरोग्यदायी आहेत. ह्यांचे सेवन केल्याने भूक कमी होते. अभ्यासात असे आढळून आले आहे की चिया सीड्स वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
सब्जा सीड्स पचनशक्ती वाढवतात. तसेच रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी त्यांचा फार उपयोग होतो.
Pingback: डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे (dark chocolate benefits in Marathi) - Help Diva